ब्रेकिंग न्यूज

मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासात आरोपी ताब्यात.

शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

 

बीड(प्रतिनिधी)बीड शहर पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परतेचा प्रत्यय देत मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला अटक करून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली.

दि. 22 जून 2026 रोजी सरकारी रुग्णालय, बीड येथून फिर्यादी योगेश श्रीरंग वाघचौरे यांची MH-23 BB-8358 क्रमांकाची, अंदाजे 60 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीस गेली होती. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

तांत्रिक माहिती व स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपी हुजेफ शेख रा.बीड शोध घेत त्याला ताब्यात घेतले. तसेच चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर विनोद घोळवे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शहेंशाह सय्यद, गोवर्धन सोनवणे, गहिनीनाथ बावणकर तसेच पोलीस अंमलदार इलियास शेख आणि राम पवार यांनी पार पाडली.

या जलद कारवाईमुळे बीड शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button