शाळा-महाविद्यालय परिसरातील रोड रोमिओंना दामिनी पथकाचा दणका.
११ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई; छेडछाड करणारांची त्याच परिसरातच धिंड काढावी.

बीड(प्रतिनिधी)शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस सुरू होताच विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) अंतर्गत दामिनी पथकाने विशेष मोहीम राबवत ११ टवाळखोरांवर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 110/117 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उमाकिरण ट्युशन, आदर्श शाळा व इतर शैक्षणिक परिसरात काही युवक विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, दुचाकीवरून कट मारणे तसेच अश्लील हावभाव व इशारे करून त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार दामिनी पथकाने साध्या वेशात गस्त घालून संबंधित युवकांना ताब्यात घेतले.
सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचे समुपदेशन करून पुन्हा अशा प्रकारचे कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला.
बीड शहरातील गर्दीच्या ठिकाणी धोंडीपुरा, सुभाष रोड,माळवेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,आदित्य कॉलेज,नाळवंडी नाका,बलभीम कॉलेज,नवगण कॉलेज,माने कॉम्प्लेक्स,नगर रोड, बार्शी नाका पॉलिटेक्निक कॉलेज तसेच इतर सर्वच क्लासेस व ट्युशन कॉलेज शाळा बाहेर दामिनी पथकाने ग्रस्त वाढवून टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी होत असून त्या आठवटवाळखोर छेडछाड करणाऱ्याचि महाविद्यालय,शाळा, क्लासेस परिसरात धिंड काढावी अशी देखील मागणी नागरिकांतून होत आहे.
दामिनी पथकाने विद्यार्थिनी, महिला व पालकांना शाळा, महाविद्यालय किंवा ट्युशन परिसरात छेडछाड, पाठलाग किंवा अन्य प्रकारचा त्रास होत असल्यास ९२२५०९२८३९ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, सविता चव्हाण व चालक पोलीस शिपाई संदीप गर्जे यांच्या दामिनी पथकाने केली.







