केज : घुले हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद.
रामेश्वर गायकवाडला उस्मानाबाद मधून केले अटक;बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील घुले हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. या अटकेमुळे बहुचर्चित खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची गती मिळाली आहे. घुलेला जखमी अवस्थेत अंबाजोगाई येथील रुग्णालयात उत्तरे दाखल करण्यात आले होते परंतु उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने केज मधील वातावरण तापले होते, आरोपीला अटक करण्यासाठी रस्ता रोको देखील करण्यात आला होता घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घुले याच्या कुटुंबीय नातेवाईकांची केज पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली होती व सर्व आरोपीला अटक केले जाईल, कोणालाही सोडणार नाही असा विश्वास दिला होता.
घुले यांच्या हत्येनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता. तसेच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी जवळपास सहा वेळा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. केज येथील शिवाजी चौकातही रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.
“सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही,” अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तपासाला गती देत विशेष पथके तयार केली आणि मुख्य आरोपीचा शोध सुरू केला. अखेर उस्मानाबाद जिल्ह्यातून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
मुख्य आरोपीच्या अटकेनंतर घुले हत्याकांडातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, केज उपविभागीय अधिकारी चेतना तिडके मॅडम, पोलीस उपाधीक्षक वेंकटराम, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,उपनिरीक्षक महेश विघ्ने,पोलीस हवालदार महेश जोगदंड, दिलीप गिते, बप्पा घोडके, भागवत शेलार आणि गणेश मराडे यांनी सक्रिय सहभाग घेत आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.











