ब्रेकिंग न्यूज

गुटखा विक्री करणारा रिक्षा पाठलाग करून पकडला.

1.57 लाखांचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत,पेठ बीड डिबी पथकाची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही बीड शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. एरवी पाच रुपयाला मिळणारी गुटक्याची पुडी आता पंधरा ते वीस रुपयाला मिळत आहे.

बार्शी रोड परिसरात ऑटो रिक्षामधून गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाल्यानंतर पाठलाग करून रिक्षा पकडत मोठी कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डीबी पथकातील पोलीस कर्मचारी अल्ताफ शेख यांना बार्शी रोडवर एका रिक्षामधून गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून रिक्षा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने रिक्षा भरधाव वेगाने पळविल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला.

बार्शी एसटी महामंडळाच्या वर्कशॉपपासून सुरू झालेला पाठलाग खादरपुरा येथील मोकळ्या जागेत संपला. पोलिसांनी एमएच-23-टीआर-0143 क्रमांकाची रिक्षा ताब्यात घेतली. तपासणीदरम्यान रिक्षामधून हिरा पान मसाला व विमल पान मसाल्यासह एकूण 1 लाख 57 हजार 884 रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारगळ करीत आहेत.

ही कारवाई पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारगळ,डीबी पथकातील पोलीस हवालदार नितीन राठोड तसेच अल्ताफ शेख, विष्णू गुजर, पांडुरंग पर्जने, औदुंबर गिरी आणि शिवाजी राख यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button