ब्रेकिंग न्यूज

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावरच चाकू हल्ला.

उपचारादरम्यान मृत्यू,आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांची केज पोलीस ठाण्यात गर्दी

केज(प्रतिनिधी)केज तालुक्यातील टाकळी येथील एका तरुण भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावरच चाकूने हल्ला करण्यात आला. पोटावर अंगावर चाकूचे वार मारहाण असल्याने त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु  उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. 20 जून) रोजी रात्री केज रस्त्यावरील एका हॉटेलवर काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी टाकळी येथील विलास नवनाथ घुले (वय 27 वर्षे) हा तरुण घटनास्थळी गेला होता. मात्र, भांडण मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विलास घुले यालाच काही जणांनी मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना तातडीने आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच टाकळी गावातील संतप्त ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी करत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आरोपीला अटक झाल्याशिवाय प्रेताब्यात घेण्यास कुटुंब व नातेवाईकांचा नकार या प्रकरणी केज पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे टाकळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर माहिती,व्रत थोड्याच वेळात देण्यात येईल 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button