ब्रेकिंग न्यूज

पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा.

48 हजारच्या मुद्देमालासह सात जुगारी ताब्यात;पेठ बीड पोलिसांची कामगिरी..

बीड, दि. 19 (प्रतिनिधी)पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरग्रस्त कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण 48 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळेलेल्या गुप्त माहिती माहितीनुसार, 19 जून रोजी रात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास पूरग्रस्त  कॉलनीतील खडेबरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या पत्र्याच्या शेडखाली काही जण पैशांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

या प्रकरणी जगन बंत्री अवचार (42), किरण भास्कर वाघमारे (32), राहुल राजेंद्र शिंदे (35), भौय्या सर्जेराव भोले (32), शेखर प्रकाश आघव (22), प्रकाश बळीराम वाघमारे (32) आणि विशाल श्रावण वाघमारे (32) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी पुखस्त कॉलनी, पेठ बीड येथील रहिवासी आहेत.

कारवाई दरम्यान पोलिसांनी 6 हजार 630 रुपये रोख रक्कम व चार मोबाईल फोन असा एकूण 48 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन माणिकराव राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 199/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील गांधीनगर,एका दर्ग्याजवळ,नाळवंडी नाका परिसर,तसेच इतर दोन ठिकाणी देखील पत्त्याचे क्लब सुरू असून यावर देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हि कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यानंद उबाळे,api पुजारी, पोलीस हवालदार नितीन राठोड, रमेश भोले, आघाव,पोलीस अंमलदार कल्याण जाधव ,डोईफोडे, भरती यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button