ब्रेकिंग न्यूज

दुधात भेसळ आढळल्यास कडक कारवाई.

दुधात भेसळ करणारावर कठोर करवाई करण्याचे मुंडे यांचे आदेश.

मुंबई (प्रतिनिधी) दुधामुळे भेसळ होत असल्याचे वास्तव समोर आले असून यामुळे नागरिकांना विविध होत असून कर्करोगासारखे महाभयंकर रुग्णात वाढ होत असल्याने चिंतेची बाब आहे. दुधात भेसळ केल्याने विशेष बालकांना व महिलांना या रोगाची लागण होत असल्याचे दिसत आहे.

राज्यात दुधातील भेसळीचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा आणि ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध दूध उपलब्ध झाले पाहिजे. दुधामध्ये भेसळीचा एकही थेंब आढळता कामा नये, दुधात भेसळ आढळली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील दूध संस्थांना दिला आहे.

मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यातील सहकारी व खासगी मिळून सुमारे 90 दूध संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

दुधामध्ये भेसळ रोखण्यासाठी दूध संकलन प्रक्रियेत कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करावे, तसेच आवश्यक ती सावधगिरी बाळगावी, असे निर्देश मुंढे यांनी दिले. दुधात कोणत्याही प्रकारची भेसळ अथवा संशयास्पद घटक आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला असून तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर तक्रार करुन माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात दुधातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करत, विविध आजारांचा धोका वाढत असल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यापुढे भेसळखोरांविरोधात कठोर मोहिम राबवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button