ब्रेकिंग न्यूज

गुटखा माफियांवर आता थेट मकोकाची कारवाई.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर;गुटखा माफियांची आता खैर नाही.

बीड(प्रतिनिधी) राज्यामध्ये गुटखाबंदी असताना देखील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये,शहरांमध्ये गुटखा राजरोस वाहतूक व विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता गुटखा माफियावर थेट मकोका लावण्याचा निर्णय घेतल्याने गुटका माफीयात  एकच खळबळ उडाली आहे 

बीड गुटखा माफियांविरोधात प्रशासनाराज्यात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापारावर आता अधिक कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी नियुक्तीनंतर तुकाराम मुंडे यांनी विभागीय यंत्रणेला अधिक सक्रिय करत भेसळयुक्त अन्नपदार्थांसह प्रतिबंधित पदार्थांविरोधात मोहीम तीव्र केली आहे.

याच पार्श्वभूमीवर, संघटित पद्धतीने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) १९९९ अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याने गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

संपूर्ण साखळी प्रशासनाच्या रडारवर

FDA कडून केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध व्यवसायाच्या संपूर्ण नेटवर्कवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

यामध्ये: उत्पादन करणारे,साठवणूक करणारे, वाहतूकदार,पुरवठादार, घाऊक व किरकोळ विक्रेते,गोदाम चालक यांच्यावर थेट मकोका कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला.

प्रशासनाच्या मते, प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार संघटित स्वरूपात होत असल्यास त्याला संघटित गुन्ह्याचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे पात्र प्रकरणांमध्ये थेट मकोका लावण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.

 तुकाराम मुंडे यांनी आयुक्त पदाचा पदभार घेताच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भेसळ करणारा धडक कारवाया केल्या आहेत तसेच धडक तपासणीत मोठा माल जप्त केला यामुळे यामुळे भेसळखोरात एकच खळबळ उडाली आहे.

FDA आयुक्तपद स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तपासणी मोहिमा अधिक वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच भेसळयुक्त दुध, तूप, थंड पेय माल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांसाठी हेल्पलाईन सुविधा

अवैध गुटखा विक्री, साठवणूक किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी माहिती देण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांनी अशा प्रकारची माहिती निःसंकोचपणे प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, गुटखा माफियांवर मकोकासारखी कठोर कारवाई करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. याच धर्तीवर दुधामध्ये भेसळ करणाऱ्या टोळ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button