ब्रेकिंग न्यूज

चक्री जुगारावर शहर पोलिसांचा छापा.

53 हजारांचा मुद्देमाल जप्त,एक ताब्यात.पोलीस निरीक्षक घोळवे ॲक्शन मोडवर.

बीड(प्रतिनिधी) बीड शहर ठाणे प्रमुख घोळवे  यांनी पदभार घेतल्यापासून बीड शहरातील अवैध  धंद्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला.

बीड शहरात विविध भागांत चोरीछुप्या पद्धतीने सुरू असलेल्या चक्री जुगारा विरोधात शहर पोलिसांनी धडक कारवाई करत बशीरगंज परिसरातून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईत टीव्ही स्क्रीन, टॅब व इतर साहित्यांसह सुमारे 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 12 जून शुक्रवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील बशीरगंज भागातील जायका हॉटेल शेजारील एका मोकळ्या गाळ्यात चक्री नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी नासेर वजीर शेख (रा. बशीरगंज, बीड) हा टीव्ही स्क्रीन व टॅबच्या माध्यमातून नागरिकांकडून पैशांवर जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले.

दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी चक्री जुगाराचे प्रमाण वाढत असल्याने तरुण वर्ग या व्यसनाच्या आहारी जात असून अनेक युवक कर्जबाजारी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी अशा अवैध चक्री जुगार अड्ड्यांवर सातत्याने कारवाई करून तरुण पिढीला या विळख्यातून वाचवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस अधिकारी व्यंकटराम व शहर पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. शहेनशहा सय्यद, इलियास शेख, महादेव परजने व नवनाथ राख यांच्या पथकाने केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button