ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये पुन्हा भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात चार वर्षीय बालक जखमी.

वाढत्या हल्ल्यांमुळे विद्यार्थी,नागरिकांत भीतीचे वातावरण;नगरपालिका प्रशासन झोपेत !

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पुन्हा एका चार वर्षीय बालकावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 दिनांक १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील पंढरी नगरी परिसरात खेळत असताना एका चार वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला जवळच असलेल्या नागरिकांनी तात्काळ कुत्र्यांना हुसकून लावल्याने पुढील अनर्थ टळला.या हल्ल्यात बालक जखमी झाले असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील पेठ बीड, बार्शी नाका,मोमीनपुरा, झमजम कॉलनी भागांत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना व बालकांना चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, एवढ्या घटना होऊनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेसाठी एका खासगी एजन्सीला टेंडर देण्यात आले होते. मात्र संबंधित एजन्सीने अवघ्या दोन महिन्यांतच काम बंद केले आहे त्यामुळे रातोरात काम बंद केलेल्या त्या संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.

“एखाद्याचा जीव गेल्यानंतरच नगरपालिका जागी होणार का?” बीड शहरातील नागरिक पिसाळण्याची वाट नगरपालिका पहात आहे का?असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ प्रभावी मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button