एकाच दिवशी दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात;बीड जिल्ह्यात खळबळ.
परळीत ग्रामसेवक तर केज मध्ये तलाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.

बीड प्रतिनिधी: बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. आज, बुधवार (दि. ८ एप्रिल) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाया करत दोन लाचखोरांना रंगेहात पकडले.
बीड जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयात लाच(पैसे) दिल्या शिवाय कामच होत नसल्याची देखील अनेक तक्रारी आहेत, कर्मचारी असो व अधिकारी यांना टेबलाच्या खरं पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नसल्याची देखील माहिती मिळत आहे.
पहिली कारवाई केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे झाली. येथील तलाठी जाधव याने वारस प्रमाणपत्रावर नाव नोंदविण्यासाठी ३९ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ३५ हजार रुपये स्वीकारताना तलाठ्याला एसीबीने जाळ्यात अडकवले.ही कारवाई Dysp सोपान चिटटमपलले, machindra बीडकर, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी यांनी केली.
तर दुसरी कारवाई परळी येथे करण्यात आली. येथे एका ग्रामसेवकाने विहिरीचे बिल काढण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार सापळा रचून संबंधित ग्रामसेवकाला ५०० रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.हि कारवाई समाधान कवडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, सचिन काळे, गणेश मेहेत्रे
विशेष म्हणजे, मागील आठवड्यातही एसीबीने दोन वेगवेगळ्या कारवाई केल्या होत्या सिरसाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि चकलंबा येथील ठाणे प्रमुखावर एसीबीने कारवाई केली होती. त्यातच आज एकाच दिवशी दोन कारवाया झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, लाचखोरीविरोधात एसीबीची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही कामासाठी जर शासकीय निमशासकीय,कर्मचारी, लोकसेवक लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंध बीड विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन Dysp सोपान चिटटमपलले, यांनी केले आहे






