ब्रेकिंग न्यूज

अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार एक कोमात.

गेवराई शहरात भीषण अपघात.

बीड (प्रतिनिधी) : गेवराई शहरातील भारत पेट्रोल पंप (नावडे सर्विस सेंटर) येथे रविवारी (दि. २२ मार्च) रात्री सुमारे ११:३० वाजता भीषण अपघात घडला. पेट्रोल भरून बाहेर निघत असलेल्या बाईकला, जवळच डिझेल भरून निघणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात बाईक चालवणारा तरुण जागीच ठार झाला असून, मागे बसलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी होऊन कोमात असल्याची माहिती आहे. मृत व जखमी दोघेही राजस्थान येथील असून ते कळंबोली डिमांड परिसरात वास्तव्यास होते.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.तर दुसऱ्याच्या अंगावरून ट्रेकचे टायर केल्याने जागेवरच मृत पावला होता.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button