ब्रेकिंग न्यूज

चकलंबा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाया.

API सचिन इंगळे ऍक्शन मोडमध्ये;वाळू,दारू व जुगारावर धाड लाखोंचा मुद्देमाल जप्त.

बीड (प्रतिनिधी) : चकलंबा पोलीस ठाण्याचा सपोनि सचिन इंगळे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरूच केला.

दिनांक १४ मार्च २०२६ रोजी चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत जुगार, अवैध दारू विक्री आणि अवैध वाळू वाहतूक प्रकरणात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पहिल्या कारवाईत चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोटारसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ₹1,07,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमजद फरीद पठाण (रा. रुबाबदार, ता. गेवराई), दिलीप विष्णू दौंड (रा. चकलांबा), पोपट विठ्ठलराव खेडकर (रा. चकलांबा), दिनकर मुरलीधर तांगडे (रा. चकलांबा) आणि एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि सचिन इंगळे, पोह/प्रधान, पोशि खटाने तसेच होमगार्ड मिसाळ, माहोनेर व शिरसाट यांच्या पथकाने केली.

दुसऱ्या कारवाईत भाट अंतरवली येथे अवैध दारू विक्रीवर छापा टाकून ₹5,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बाळू राजाराम कापसे (रा. भाट अंतरवली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सफौ चांदमारे आणि पोह पवार यांनी केली.

तिसऱ्या कारवाईत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राक्षसभुवन शिवारात अवैध वाळू वाहतूक करताना एक हायवा पकडण्यात आला. या कारवाईत हायवा व ४ ब्रास वाळू असा एकूण ₹35,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख वसीम यासीन (रा. मादळमोही) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सपोनि सचिन इंगळे, सफौ चांदमारे, पोह पवार, दराडे तसेच होमगार्ड मिसाळ आणि आव्हाड यांच्या पथकाने केली.

तसेच उमापूर गावात सोरट जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर छापा टाकून ₹20,160 रोख रक्कम व इतर साहित्य ₹80,500 असा एकूण ₹1,00,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी राजू शिंदे (रा. बालम टाकळी, ता. शेवगाव), आसिफ नसिर शेख (रा. बोधेगाव), शेषराव यशवंत कापसे, अमोल बाबुराव हवाले, आकाश वसंत गायकवाड आणि हकीम खलील पठाण (सर्व रा. उमापूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाया बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगळे, पोह/प्रधान, पोशि खटाने तसेच होमगार्ड मिसाळ, माहोनेर व शिरसाट यांच्या पथकाने केली.

चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाया केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले परंतु अवैध धंद्यां वाल्यामध्ये खळबळ उडाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button