ब्रेकिंग न्यूज

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड.

दहा जुगारी ताब्यात;पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांची पहाटे धडाकेबाज कारवाई.

बीड (प्रतिनिधी) बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड जिल्ह्यातील गुटखा,मटका,गांजा, अवैध दारू सह इतर सर्वच अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ठाणे प्रमुखाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी बीड शहरात काही ठिकाणी चोरीछुपे पत्त्याचे क्लब सुरु असून याकडे स्थानिक पोलीस मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

बीड शहरातील किल्ला मैदान परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धाड टाकून दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २ लाख १८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड शहरातील किल्ला मैदान येथील परिसरातील मोकळ्या जागेत ‘तिर्रट’ नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बल्लाळ यांच्या पथकाने आज पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा २ लाख १८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ राख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद शहंशाह हे करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button