पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत रस्त्यावर उतरून कॅमेरे पाहाणी.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक.

बीड (प्रतिनिधी): बीड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी तात्काळ दखल घेत स्वतः रस्त्यावर उतरून कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्यांच्या या कार्यतत्परतेची शहरात चर्चा होत आहे.
मागील आठवड्यात बीड शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे रामभरोसे असल्याची बाब समोर आली होती, कॅमेरा खाली असणारी डीपी ही उघडी असल्याचे दिसले होते.या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी भर उन्हात चालत जाऊन बार्शी रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हेही उपस्थित होते.
शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी, वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसावा, चोरांचा गुन्हेगारांचा तपास करताना मदत व्हावी म्हणून बीड शहरातील रस्त्यावर, चौकात सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे कॅमेरे कार्यरत असणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेला तत्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस अधीक्षक स्वतःरस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे पोलीस प्रशासन अधिक सजग झाल्याचे चित्र दिसत आहे.








