ब्रेकिंग न्यूज

सुशील कराडच्या फेसबुक पोस्टने खळबळ !

"आता मात्र सर्वासमोर सर्व काही बोलणार" सुशील कराडची पोस्ट चर्चेत.

बीड(प्रतिनिधी)केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर त्यांनी पुढील न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाकडून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या सुटकेच्या आशा मावळल्या आहेत.

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मुलगा सुशिल कराड याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत “आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार” असे सूचक विधान केले आहे. या पोस्टमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, सुशिल कराड नेमके काय बोलणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे आधीच बीड जिल्ह्यात वातावरण तापलेले असताना, सोशल मीडियावरील या पोस्टने चर्चेला नवे वळण मिळाले आहे. सुशील कराडचा रोष कोणाकडे आहे असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे सोशल मीडियावर मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुशिल कराड यांच्या पोस्टनंतर ते पत्रकार परिषद घेणार का किंवा अधिकृत भूमिका मांडणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र अद्याप त्यांच्या पुढील भूमिकेबाबत स्पष्टता आलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणाकडे बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत घडामोडी वेगाने घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button