ब्रेकिंग न्यूज

जुगार खेळताना तिघे पोलिसाच्या ताब्यात.

७५ हजारांची रोकड जप्त,DYSP पूजा पवार पथकाची करवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील अवैध धंद्यांविरोधात Dysp पूजा पवार पथकाची पुन्हा एकदा धडक कारवाई करत जुगार खेळणाऱ्या तिघांना रंगेहात पकडले. पूजा पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून मोहिमांचा वेग वाढला असून सातत्याने कारवाया सुरू आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस स्टेशन हद्दीत जुगारविरोधी मोहीम राबवण्यात आली. दि. १३ रोजी आंबेडकर चौक परिसरातील बाजार तळ व मंडई भागात सापळा रचून दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ हजार ३२० रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नवनीत कावत व सचिन पांडकर यांच्या सूचनेनुसार पार पडली. पथकात उपनिरीक्षक सागर सोन्ने, पोलीस अंमलदार सचिन आगलावे, सुधीर हजारे आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ताब्यात घेतलेल्या तिघांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, डीवायएसपी पथकाकडून कारवाया होत असताना पेठ बीड पोलिस अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे का?असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पेठ बीड पोलीसाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button