ब्रेकिंग न्यूज

बीड शहरातील मुलींच्या छेडछाड प्रकरणी कडक कारवाई करा :डॉ.क्षीरसागर

भाजप युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर,नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचे एसपींना निवेदन.

शाळा-कॉलेज परिसरात दामिनी पथकाचे पेट्रोलिंग, बंद पोलीस चौक्या सुरू करण्याची मागणी.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून दखल घेण्याची गरज.

बीड (प्रतिनिधी)दि.१० :बीड शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस परिसरात वाढत्या छेडछाड घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची मंगळवारी (दि. १०) भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या बाहेर सध्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत असल्याची बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. काही ठिकाणी अशा प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस परिसरात दामिनी (चिडीमार) पथकाच्या माध्यमातून सातत्याने पेट्रोलिंग करून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. याशिवाय शहरातील अनेक पोलीस चौक्या सध्या बंद अवस्थेत असल्याने त्या तातडीने सुरू करून तेथे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही डॉ.क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवा नेते राणा चव्हाण, भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button