ब्रेकिंग न्यूज

मुकदमाचे अपहरण- सहा आरोपी विरोधात गुन्हा ..!

धारूर तालुक्यातील घटना.

*मुकादमाचे अपहरण; सहा आरोपी विरोधात गुन्हा ‘ साखर कारखान्याशी धागेदोरे*
दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी .
अंबाजोगाई-प्रतिनिधी:-
धारूर तालुक्यातून एका मुकादमाचे अपहरण केल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दादासाहेब श्यामसुंदर बडे रा. कासारी बोडखा, ता. धारूर, जि. बीड असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३५ वाजता दादासाहेब बडे हे दुचाकीवरून सोनीमोहा येथून कासारीकडे जात असताना, आंबेवडगाव ता. धारूर परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीने (MH 46 BM 5488) त्यांचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण करून स्कार्पिओ गाडीतून नेल्याचा आरोप आहे.
या गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
सोनू उर्फ रावण धुमाळ (रा. कसबा धारूर),
श्रीकृष्ण उर्फ बबलू दराडे (रा. आसोला, ता. धारूर),संतोष चौरे (रा. केज),किशोर संदिपान फड (रा. चोंडी, ता. धारूर),
मनोज उर्फ सोनू चंद्रशेन घोळवे (रा. आंबेवडगाव, ता. धारूर)
आणि समाधान कोंडीराम मुंडे (रा. चोंडी, ता. धारूर).
तपासादरम्यान आरोपी समाधान मुंडे याच्या जबाबावरून दादासाहेब बडे यांना अथनी शुगर, शाहूवाडी युनिट (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.या साखर कारखान्याशी संबंधित व्यक्तींमध्ये योगेश श्रीमंत पाटील व श्रीनिवास श्रीमंत पाटील (मालक), विनोद पाटील (मुख्य शेती अधिकारी), महेश कदम (लेबर भरती अधिकारी), तसेच संतोष चव्हाण व बाबासाहेब शेळके (वसुली अधिकारी) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेमुळे धारूर तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे . या मध्ये सोनू घोळवे व रमेश मुंडे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोळीस कोठडी मिळाली आहे

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button