ब्रेकिंग न्यूज

कपिलधार मध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला.

PSI पल्लवी जाधव,AHTU पथक व सामाजिक संस्थांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) पथक प्रभावी कारवाई करत आहे. अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात पोलिसांना व सामाजिक संस्था संयुक्त विद्यमान संस्थेला यश आले.

दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास बीड तालुक्यातील कपिलधार देवस्थानामध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव,AHTU पथक वराजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ठिकाणी पोहोचून चौकशी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी विवाहाची प्रक्रिया तत्काळ थांबवून बालविवाह रोखला.

या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे बालविवाह आढळल्यास तात्काळ AHTU पथकाशी, PSI पाल्लवी जाधव यांना माहिती द्यावी, जेणेकरून वेळेत हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई करता येईल असे आवाहन करण्यात आले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button