ब्रेकिंग न्यूज

ब्राह्मण महाअधिवेशन – संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न.

मंथन हॉल,बीडबायपास रोड - १ फेब्रुवारी २६

 

 

 

*छत्रपती संभाजी नगर मध्ये ब्राह्मण महाअधिवेशन संपन्न*
अंबाजोगाई-प्रतिनिधी:-
अखिल भारतीय पेशवा संघटना यांच्यावतीने राज्यस्तरीय ब्राह्मण महाअधिवेशन दिनांक 1/2/26 रोजी संपन्न झाले या अधिवेशनाच्या उद्घाटनाला उद्घाटक. श्री विवेकजी देशपांडे प्रसिद्ध उद्योगपती यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व उद्योजकतेबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांनी उद्योग व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले. सर्वांचे स्वागत अध्यक्ष सचिन जी वाडे पाटील यांनी केले
विशेष सत्कारमूर्ती म्हणून श्री कॅप्टन आशिष जी दामले अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचं मार्गदर्शनही उपस्थित यांना लाभले त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ व त्याच्या कार्यपद्धतीबद्दल व पुढील योजनांबद्दल माहिती दिली.
बंडू नाना सराफ परभणी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचबरोबर भानुदास शैचे यांनाही जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विजय शास्त्री महाराज यांनी उपस्थित त्यांना वेदाचे रक्षण व त्याचे संरक्षण कसे करावे याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. श्री. राजेंद्र तोंडापूरकर यांनी सूक्ष्म. लघु. मध्यम उद्योग. याबद्दल माहिती दिली व त्याचा उपयोग कसा करायचा सविस्तर माहिती उपस्थित त्यांना सोप्या शब्दातून दिली.
दुपारच्या सत्रामध्ये. राम कुलकर्णी यांनी उपस्थितांना शिक्षण व शासकीय संधी कुठल्या उपलब्ध आहेत आणि ते आपण कशा प्राप्त करून घ्याव्यात याबद्दल माहिती दिली. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष निखिल लातुरकर यांनी स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांचे सपत्नीक खारीक खोबरे हार घालून सत्कार करण्यात आला, तसेच श्री राजू काजे प्रसिद्ध गायक यांनी संगीत क्षेत्रातील संधी व त्याचा सराव कसा करावा संगीताचा तसेच संगीताबद्दल रागाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी दोन भावगीत गायन केले व वातावरणात उत्साह निर्माण केला, श्री अनिकेत जी सराफ गायक यांनी कलाक्षेत्रामध्ये ब्राह्मण समाजाचा योगदान याबद्दल माहिती दिली. सौ श्रुती ताई कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व तरुण वर्गांना आयटी क्षेत्रातील संधी याबद्दल भरपूर असे मार्गदर्शन केले आणि ते तरुण पिढीला अतिशय लाभकारक होणार असा विश्वास सर्व उपस्थित तरुण मंडळींनी व्यक्त केला. डॉक्टर विजय महाजन यांनी आयुर्वेदातील ब्राह्मण समाजाचे योगदान व आयुर्वेद या विषयावरती मार्गदर्शन केले.
बाजीराव धर्माधिकारी यांनी राजकारण व समाजकारण याचा संगम कसा साधावा याबद्दल मार्गदर्शन केले.
श्रीमती प्रज्ञा पौंक्षे यांनी उपस्थित सर्व महिलांसाठी महिलांच्या आर्थिक नियोजन व घर या विषयावरती सर्व महिलांना मार्गदर्शन केले . विशेष उपस्थिती विजयाताई किशोर राहटकर राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष यांची लाभली त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांचा सन्मान सौ सुप्रिया सचिन वाडे पाटील यांनी केला.
समारोप आचार्य महामंडलेश्वर श्रीमंत सुधीर दास महाराज काळाराम मंदिर नाशिक यांनी ब्राह्मण आणि संस्कार या विषयावरती मार्गदर्शन केले.
नूतन नगराध्यक्ष अंबड चौक देवयानी ताई केदार कुलकर्णी यांचासह नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विजय काजे, धनंजय नारळे, संतोष जोशी, उदय खांडेकर, योगेश धर्माधिकारी, रवींद्र पंडित, काशिनाथ चांदसकर, लक्ष्मीकांत दडके , अरविंद तेलवाडकर, योगेश जोशी, संजय देशपांडे, दिपक कासाडे, अभय जोशी, महेश कुलकर्णी, जया काळे, सुनिता तरटे यांनी विशेष प्रयत्न केले. अधिवेशनासाठी
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष मोरेश्वर मार्डीकर यांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button