ब्रेकिंग न्यूज

खुणातील आरोपीला ठोकल्या बेडया.

दहा तासांत खुनाचा उलगडा; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,आरोपी अटकेत

बीड, (प्रतिनिधी):शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांच्या आत करून आरोपीला अटक केली आहे.

चांद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर होता. रविवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी तो “बीडला जातो” असे सांगून स्वतःच्या मोटारसायकलवरून घरातून निघाला होता. मात्र तो रात्रीपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

सोमवारी सकाळी रायमोहा परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर दगडाने मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक माहिती व गुप्त खबर यांच्या आधारे संशयित आरोपीला बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले.

या खुणातील आरोपी; अतिक गुलाब तांबोळी वय -29 रा. इस्लामपुरा बीड असे असून पैशांच्या व्यवहारातून हा वाद निर्माण होऊन खून केल्याची माहितीने आरोपीने दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या बारा तासांत खून प्रकरणाचा छडा लावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, ठाणे गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी बंटेवाड,पीएसआय खटावकर पीएसआय सुतुळे, अशोक दुबाले,राहुल शिंदे,सोमनाथ गायकवाड,मारुती कांबळे,बाळू सानप,अश्फाक सय्यद,मनोज परजने,अतुल हराळे, अलीम शेख, विकी सुरवसे व स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी अवघ्या दहा तासात गुन्हा उघडकीस आणत खुनातील आरोपीला जेरबंद केले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button