बीडमध्ये जीएसटी मोठा घोटाळा?संभाजीनगरचे पथक शहरात दाखल.
जीएसटी अधिकाऱ्याच्या पथकाकडून पेठ बीड भागात व्यापाऱ्याची चौकशी.

बीड( प्रतिनिधी ) बीड शहरात सुरू असलेल्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संभाजीनगर येथील विशेष पथक आज (गुरुवार, दि. २२ जानेवारी) सकाळी बीड शहरात दाखल झाले आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जीएसटी बुडवल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात अनेक व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून यासंदर्भात गुन्हाही दाखल झालेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीनगरच्या पथकाने बीड शहरातील शनी मंदिर परिसरात एका व्यापाऱ्याच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली आहे.
या कारवाईदरम्यान पेड बीड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवून आहेत. सध्या संबंधित ठिकाणी चौकशी सुरू असून नेमकी काय कारवाई होत आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात जीएसटी घोटाळा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यानुसार आता तपासाला वेग आला असून पुढील काही तासांत या प्रकरणातील सविस्तर माहिती उघड होण्याची शक्यता आहे.







