ब्रेकिंग न्यूज

दिवसा ढवळ्या फायरिंग करून खून !

बीड शहर पुन्हा हादरलं;तोंडावर तीक्ष्ण हत्याराने वार.

बीड प्रतिनिधी बीड बीड शहरातील अंकुश नगर भागात प्लंबिंग चे काम करणाऱ्या कामगारावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला, त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने तोंडावर वार केल्याने शिंदे नामक कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

दिनांक ६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील अंकुश नगर भागात हर्षद (दादा)शिंदे  वय ३५ वर्राष राहणार हाऊसिंग कॉलनी धानोरा रोड बीड या कामगारावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत तीक्ष्ण हत्याराने वार केला या त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने बीड शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बंदुकीने फायर केलेले बुलेट रिकामी पुंगळी सापडले असून फॉरेन्सिक लॅबने ताब्यात घेतली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक पूजा पवार,स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मूदिराज, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बरेच दिवसापासून शांत असलेल्या बीडमध्ये पुन्हा खून झाल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती शहरभर पसरली. यावेळी अंकुश नगर मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली.

आरोपींना शोधण्यासाठी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे तीन रवाना झाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button