प्रभाग क्रमांक २५ मध्ये कमळ फुलणार;शिराळे यांचे सामाजिक कार्य सत्कर्मी येणार.
शिराळे व पिंगळे यांनच्या भव्यदिव्य पदयात्रेत नागरिकांचा उत्सर्फ प्रतिसाद.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील प्रभाग क्र.२५ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती रवींद्र घोमरे (घुंबरे) यांच्या व नगरसेवक पदाचे प्रभाग क्र.२५ मधील अजिंक्य शिराळे व सौ.ज्योती नंदू पिंगळे यांच्या प्रचारार्थ दिनांक 30 नोव्हेंबर रोजी प्रभागात भव्य पदयात्रा झाली.मतदारांचा वाढता प्रतिसाद हा विजयाची चाहूल देणारा आहे. हे या पदयात्राने सिद्ध झाले आहे.
बीड शहरातील प्रभाग क्रमांक २५ चे भाजप चे अधिकृत उमेदवार अजिंक्य शिराळे आणि ज्योती नंदकिशोर पिंगळे यांनी या प्रभागाला मतदारांच्या गाठीभेटी घेत डोअर टू डोअर प्रचार केल्याने या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे. या पाठिमेच्या बळावरच यांचा विजय निश्चितच अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत.अजिंक्य शिराळे यांना प्रभाग क्रमांक २५ मधून नागरिकांची पसंती मिळत आहे. हे कालच्या रॅली मधून दिसून आले.रॅली ला लहान थोर नागरिक तसेच असंख्य महिला ही उपस्थितिथी लक्षणीय होती.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप ने आपला प्रचार अधिक तीव्र केला असून, काल भाजप पक्षाचे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. उमेदवारांनी या रॅलीत सहभाग घेत आपले मोठे शक्तीप्रदर्शन केले. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. नगरसेवक पदाचे उमेदवार अजिंक्य भैय्या शिराळे व ज्योती ताई पिंगळे यांनी रॅलीदरम्यान अनेक ठिकाणी थांबून नागरिक, महिला, तरुणांशी संवाद साधला.शिराळे पिंगळे या दोन्हीही उमेदवारानी या प्रभागातील नागरिकाांशी संवाद साधत मतदान आरोपी आशीर्वाद देण्याचे आवाहन करून आशीर्वाद घेतले. अजिंक्य शिराळे व ज्योतीताई पिंगळे यांना या प्रभागातून वाढता पाठीींब मिळत असून या रॅलीने विजय रॅली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते











