ब्रेकिंग न्यूज

बिबट्याचा शेळीवर हल्ला;शेतकऱ्यांत भितीचे वातावरण.

वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसत आहे.रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळत आहे.मात्र वनविभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. 

    बीड तालुक्यातील वानगाव परिसरात बिबट्याच्या हालचालींनी भीतीचे सावट पसरले आहे. वानगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर काल रात्री बिबट्याने हल्ला करून हौसेराव नारायण जोगदंड यांच्या एका शेळीची शिकार केली. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच आज सकाळी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्या अद्यापही याच परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले असून, आज दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा एकदा दिसल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीजवळच दबा धरून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वनविभागाने शेतकरी बांधवांना सतर्कता सूचना जारी केल्या आहेत :

🔸 पाळीव जनावरे रात्री उघड्यावर सोडू नयेत. शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी यांना सुरक्षित बांधिस्त गोठ्यात ठेवावे.

🔸 शेतात पहाटे व सायंकाळी काम करताना सावधानता बाळगावी. एकट्याने जाणे टाळावे व सोबत काठी किंवा साधन ठेवावे.

🔸 गटाने काम करणे सुरक्षित. दोन-तीन जणांनी एकत्र शेतात काम केल्यास धोका कमी होईल.

🔸 बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बिबट्याला सुरक्षित पद्धतीने पकडण्यासाठी आवश्यक जाळ्यांची आणि पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

या संकटाच्या काळात सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेले एक वर्षापासून बिबट्याचे दर्शन होत असेल वन विभाग मात्र बिबट्याला पकडण्यात अपयशी असल्याचे दिसतं असून वनविभागाला गांभीर्य नसल्याचे देखील दिसत आहे.बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्याला भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी तर होत आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button