ब्रेकिंग न्यूज

DYSP पूजा पवार यांची मटका जुगारावर धडक कारवाया.

साठ हजारांहून अधिक रोख रक्कम जप्त;स्थानिक पोलीस हप्ते घेऊन गप्प ?

बीड(प्रतिनिधी):बीड पोलिस उपाधीक्षक पदी पूजा पवार यांची नियुक्ती झाल्यापासून बीड शहरातील अवैध धंद्यावर बेधडक कारवाया केल्या जात आहेत.स्थानिक पोलिस मात्र त्या अवैध धंद्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

     बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू ठेवत डीवायएसपी पूजा पवार यांच्या पथकाने पुन्हा एकदा मोठी मोहीम छेडली आहे. काही दिवसांपूर्वी हवाला रॅकेटवर केलेल्या संयुक्त कारवाईनंतर, पवार यांच्या नेतृत्वाखाली पेठ बीड परिसरातील मटका-जुगार व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक 18 नोहेंबर रात्री 8:30 वाजता मोठी धडक मोहीम राबवून तीन जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे घालण्यात आले.

   या कारवाईत पोलिसांनी ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये रोख रक्कम, वह्या, मोबाईल सेट, जुगार साहित्य अशा विविध वस्तू जप्त केल्या. सर्व अड्ड्यांवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गोपनीय माहिती मिळताच पथक सज्ज :

    पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून मटका व जुगाराचे व्यवहार खुलेआम सुरू असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांच्या टीमला मिळाली होती. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणांवर गुप्त तपास सुरु करून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तीन ठिकाणी एकाच वेळी छापे घालून कारवाई पूर्ण केली.

बीड शहरातील इतर अवैध धंद्यांवरही कारवाईची मागणी जोरात :

बीड शहरात जुगार आणि हवाला प्रकरणाबरोबरच इतर अनेक अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून वेळोवेळी केली जाते. त्यामध्ये बीड शहरात मटका व पत्त्यांचे क्लब गुटख्याची तस्करी व बेकायदेशीर विक्री नशेच्या गोळ्या, बेकायदेशीर इंजेक्शन्स,गांजा,नशेची पानं,शहरात मुख्य रस्ता तसेच टपरीत अवैध दारू सह इतर मादक पदार्थांची विक्री असे अनेक प्रकार खुलेआम सुरू असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

 डीवायएसपी पूजा पवार यांच्या अलीकडच्या कारवाया पाहता, शहरातील अवैध धंदे मोडीत काढण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. जशा प्रकारे जुगार अड्ड्यांवर धडक दिली, त्याचप्रमाणे गुटखा,मटका, पत्त्यांचे क्लब आणि गांजा विक्रेत्यां वरही तितकीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अवैध धंद्यांना आळा बसणार?

डीवायएसपी पूजा पवार यांच्या सलग आणि धारदार कारवायांमुळे शहरातील अवैध धंदे डगमगत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हवाला रॅकेटवर झालेल्या धाडी नंतर आता मटका-जुगार अड्ड्यांवर झालेली ही कारवाई मुळे अवैध धंदे करणाराचे धाबे दणाणले आहेत.

अवैध धंद्यावर अश्याच कारवाया सातत्याने सुरू राहिली तर बीड शहर गुन्हे मुक्त आणि सुरक्षित होण्यास मदत होईल.

   ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक पूजा पवार , पो.सचिन आगलावे, पो.औसरमल यांसह पेठ बीड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button