ब्रेकिंग न्यूज

पंडितांना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवणार : पप्पू कागदे.

पप्पू कागदे यांना नगराध्यक्ष पदासाठी डावल्याने आंबेडकर जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया.

बीड येत्या काही दिवसावर बीड नगरपालिका निवडणूक असल्याने बीड मधील वातावरण मात्र तापू लागले आहे.

बीड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करताना केलेल्या बदलामुळे आंबेडकरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते पप्पू कागदे यांचे नाव महिला राखीव (सामान्य) प्रवर्गातून अंतिम क्षणी बदलून मुस्लिम समाजातील एका कुटुंबातील महिलेच्या बाजूने उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप पप्पू कागदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कागदे म्हणाले की, “आमच्या समाजातील भगिनींना आरक्षणातून बाहेर ढकलून, आमच्या भावनांचा अनादर करून उमेदवारी दिली गेली. आमच्या समाजातील महिलांशी लग्न करून आरक्षणाचा फायदा घ्यायचा आणि नंतर निवडणुकीत दुसऱ्यालाच उमेदवार करायचा — ही लाजिरवाणी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतली आहे.”

या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजात संतप्त भावना उसळल्या असून, येत्या सर्वच निवडणुकांत राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला मतदान न करण्याचा ठाम निर्णय आंबेडकरी जनतेने घेतल्याचे कागदे यांनी सांगितले.

पक्षाकडून स्वतःचा सर्वे केल्याचे सांगितले असले तरी, “पप्पू कागदे यांचा सर्वे कोणी करूच शकत नाही. तीन तारखेला मीच सर्वे सांगणार आहे, आणि माझी जागा कुठे आहे ते दाखवून देणार आहे. मला डावलल्याची राजकीय किंमत पक्षाला शहरातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात चुकवावी लागेल,” असे त्यांनी आव्हानात्मक भाषेत सांगितले.

दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांची २६ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक होणार असून, पुढील राजकीय दिशा व भूमिका ठरविण्याचे संकेत पप्पू कागदे यांनी दिले.

या घटनाक्रमामुळे बीड नगरपरिषद निवडणुकीत नवीन समीकरणे तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे; तसेच संतप्त आंबेडकरी जनतेने केलेला निर्धार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला नुकसान होण्याची शक्यता आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button