ब्रेकिंग न्यूज

प्रभाग क्रमांक २४ मध्ये अफसर शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा.

समाजसेवेची जाण,गोरगरिबांना मदत हीच अफसर भाई यांची ओळख.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी नाका भागातील समाजसेवक अफसर शेख हे गेल्या पंधरा वर्षापासून समाजसेवेच्या माध्यमातून आणि गोरगरिबांना मदत व तरुण वर्गाला व्यवसायाकडे वळवण्यात मोठा वाटा असल्याने प्रभाग क्र. २४ मधून समाजसेवक अफसर शेख हेच सक्षम सक्षम व प्रबळ दावेदार असल्याची चर्चा या प्रभागात होत आहे. 

   गोरगरिबांना मदत, सर्व जाती-धर्मातील नागरिकांशी जवळचा संपर्क आणि लोकसेवेची भावना यामुळे अफसर शेख यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ समाजसेवा व विकासकामांच्या बळावर त्यांनी आपली छाप पाडली आहे.

    गेल्या १५ वर्षांपासून ते सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय आहेत. शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचे तरुण म्हणून त्यांना ओळखले जाते.या प्रभागातील गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, महापुरुषांच्या जयंती तसेच रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टी अशा सर्व उत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. यामुळे अफसर शेख सर्वतोपरीचीत आहेत.

    अफसर शेख यांना कोणतेही राजकीय पद नसतानाही जनसेवेचा वसा जोपासणारा समाजाभिमुख चेहरा म्हणून ओळख. अफसर शेख यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वच समाजातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले असून, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला आहे. त्यांच्या प्रयत्नातून प्रभागातील स्वच्छता, लाईट, पाइपलाइन यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत.

स्थानिक नागरिक अडचण आल्यास त्यांच्याकडे धाव घेतात आणि त्यांच्याच माध्यमातून समस्या सोडवतात. त्यामुळे “प्रभाग क्र. २४ चे नेतृत्व अफसर भाई यांनीच करावे” अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

नागरिकांचा विश्वास आणि त्यांच्या कार्यशैलीवर आधारित पाठिंबा लक्षात घेता, या प्रभागात अफसर शेख हे दमदार उमेदवार म्हणून उदयास येत असून — “विकास आणि सर्वसमावेशक सेवा” हेच त्यांचे मुख्य ब्रीदवाक्य राहणार आहे.

शेख अपसर हे नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने अनेकांचे गणित बिघडल्याची देखील चर्चा होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button