ब्रेकिंग न्यूज

गळफास की घातपात ? बस स्थानकासमोरील गल्लीत मृतदेह आढळला.

जमिनीलगत लटकलेल्या मृतदेहामुळे संशयाचे धुके;दिवसभरातली गळफास घेतलेली दुसरी घटना.

बीड : शहरातील बस स्थानकासमोरील गल्लीत शुक्रवारी सकाळी एका भाजी विक्रेत्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. दिवसभरातील गळफासाची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

अशोक हिरामण गालफाडे (रा. पालसिंघन, ता. जि. बीड,ह. मुक्काम रमाई नगर, खंडेश्वरी मंदिराजवळ, बीड) असे मृताचे नाव असून ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळत आहे. दिनांक आठ मे शुक्रवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बस स्थानकासमोरील गल्लीत पिंपळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत जमिनीलगत असल्याने गळफास की घातपात?असा संशय व्यक्त केला जात होता यामुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेह जमिनीलगत लटकलेल्या अवस्थेत दिसत असल्याने परिसरातील काही नागरिकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला.

मृताचे आई-वडील पुणे येथे वास्तव्यास असल्याने मृतदेह त्यांच्या चुलत भावाच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी साह्ययक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, मंगेश जाधव, पो.ह. भारती व पो.ह. बबन जाधव यांनी पुढील कार्यवाही केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button