
बीड (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बळीराम जनार्दन देवकते (वय 45, रा. ढेकणमोहा, ता. जि. बीड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम देवकते यांनी दिनांक 22 एप्रिल गुरुवार रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.
देवकते हे अत्यंत कष्टाळू व मायाळू स्वभावाचे असल्याने ढेकनमो गावच्या जवळपासच्या गावात सर्वतोपरीत होते यांच्या आत्महत्येमुळे ढेकणमोहा परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.





