

*केज येथे शिक्षकाची आत्महत्या*
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील शाळेतील सहशिक्षक सूर्यकांत बालसाहेब वाघमारे वय ४१ राहणार लहुरी ह मु शाहूनगर केज यांनी कमल पेट्रोलपंप जवळील शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. कारण अद्याप स्पष्ट झाले नाही वाघमारे यांच्या पत्नी तलाठी आहेत,त्यांच्या पश्चात २ मुले आणि पत्नी आहे. दि ९ जून रोजीरात्री ९ च्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून पो कॉ तुकाराम मुरकुटे यांनी घटनास्थळी जाउन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दिला.असून,
पुढील तपास चालू आहे.







