पुन्हा एकाच खून !
मित्रानेच धारदार शस्त्राने वार करत केला खून;मोबाईल मधील अक्षयपार्य फोटो वरून वाद.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.मागील काही महिन्यात बीड जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून शिरूर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन तरुणाचा मित्रानी खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना नारायण गडाच्या पायथ्याशी 26 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत युवकाचे नाव सुमित सुशांत गवते राहणार बेलरा ता.जि.बीड (वय 17) असे असून त्याच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार करून त्याची हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, मोबाईलमधील काही आक्षेपार्य फोटोच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
नारायण गड देवस्थानाच्या पायथ्याशी हेलिपॅडसाठी असलेल्या मोकळ्या जागेत प्रथम वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे मारामारीत झाले आणि त्यात सुमित गवते याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपीनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात एका होमगार्डचा देखील सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एकूण आरोपी चार असल्याची माहिती मिळत असून त्यापैकी एक पोलिसांच्या ताब्यात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शिरूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात देण्यात येईल





