ब्रेकिंग न्यूज
बीड झमझम कॉलनीमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी.
जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

बीड (प्रतिनिधी आनंद वीर )बीड शहरातील शहर पोलीस ठाणे हद्दीतील झमझम कॉलनी परिसरात रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व ट्रॅव्हल्स मालक या दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेत ईकराम खान यांना ओठाला गंभीर मार लागला असून त्याला तत्काळ बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे नातेवाईक व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात देण्यात येईल.







