ब्रेकिंग न्यूज

दामिनी पथकाची वर्षभरात २२३ रोडरोमियोवर प्रतिबंधात्मक कारवाई 

PSI पल्लवी जाधव यांनी दामिनी पथकाचा चार्ज घेतल्यापासुन रोडरोमियोंवरील कारवाई मधे वाढ 

बीड( प्रतिनिधी) दामिनी पथक बीड शहरात गस्त करत असताना शिवाजी विद्यालय बीड परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या १३ रोडरोमियोंना ताब्यात घेवून पोस्टे शिवाजीनगर बीड येथे हजर करून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. दामिनी पथक पथक हे जिल्यातील विविध शाळा व कॉलेजला भेट देवून मुलींसह विद्यार्थ्यांना कायदेविषयक तसेच आत्मसंरक्षण विषयक मार्गदर्शन करून जनजागृती कार्यक्रम घेत आहे. तसेच शहरात व तालुक्यातील शाळा, कॉलेज, कॉफी शॉप व वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालत असते. गस्ती दरम्यान शाळकरी व कॉलेजच्या मुलींना त्रास देणाऱ्या व छेड काढणाऱ्या रोडरोमियोंवर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक केसेस करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे वर्षभरात २२३ रोडरोमियोवर वरीलप्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या आहे. तसेच मुलीकडून तक्रार आलेल्या काही टवाळखोर यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे.

    सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत सर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस शिपाई गजानन चौधरी, योगेश निर्धार सर्व दामिनी पथक बीड यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button