ब्रेकिंग न्यूज

कर्कश व ठो ठो आवाज करणाऱ्या बुलेटवर वाहतूक पोलिसांची कारवाई.

बुलेट धारकाला दंड आकारून 19 सायलेन्सर जप्त.

बीड शहरातील नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या कर्कश व ठो–ठो आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर बीड वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागात मोहीम राबवून कारवाई केली आहे.

शहरातील माने कॉम्प्लेक्स, राजीव गांधी चौक, अंबिका चौक ,,सुभाष रोड,कोचिंग क्लासेस तसेच सायंकाळी ट्राफिक ऑफिस समोर विशेष मोहीम राबवून एकूण 19 कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी देखील बीड शहर वाहतूक पोलिसांनी कर्कश्य व मोठ्या आवाजा करणाऱ्या बुलेट स्वरावर कारवाई करत अनेक बुलेट चे सायलेन्सरवर रोड रोलर चालवण्यात आले होते.

ही कारवाई वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस हवालदार बाळासाहेब नागरगोजे, राजाभाऊ तांदळे, आदिनाथ बांगर, पोलिस अंमलदार सिद्धांत गोरे, राहुल घाडगे, चालक पोलीस हवालदार संतोष हरके तसेच चालक अमलदार दत्ता कदम यांनी कारवाई केली.

कर्कश आवाजामुळे नागरिक, विद्यार्थी, वृद्ध व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. बुलेट स्वार वेगवेगळ्या सायलेन्सर मॉडीफाय करून रहदारीच्या ठिकाणी बुलेट राजा मुद्दाहून बुलेट  आवाज करतं असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. बीड वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील शांतता अबाधित राहण्यास मदत होणार असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button