टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश(अण्णा)जाधव यांचे कौतुकास्पद कार्य.
नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण,राकेश जाधव म्हणजे "एक कॉल प्रॉब्लेम स्वॉल"

टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश(अण्णा)जाधव यांचे कौतुकास्पद कार्य.
बीड शहरातील खंडेश्वरी मातेच्या मंदिर पायथ्याशी लगत असणारी माता रमाई कॉलनी येथे नगरपालिकेकडून नाली साफसफाई न झाल्याने नाली तुंबून भरून रस्त्यावर वाहत असल्याने अनेक दुचाकी सार घसरून पडत होते.त्याच बरोबरच नालीतील पाणी रमाई नगर भागातील नागरिकांच्या दारात साचत असल्याने दुर्गंधीचा सामना करवा लागत आहे.
किही दिवसापूर्वी पार पडलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नगरपरिषदेच्या माध्यमातून खंडेश्वरी मंदिराकडे जाणारे रस्ते साफसफाई व कचरा उचलला होता परंतु 100 फुटावर असलेल्या रमाई कॉलनी मधील नारी साफसफाई व कचरा उचलण्यात आला नसल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते.
सध्या पावसाचं थैमान राज्यभरा बरोबरच बीडमध्ये ही गाजलेला आहे, दिवसातून कधीही पाऊस पडतो आणि त्या पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नेहमीच रमाई कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याची ही नाली तुंबून सर्व घाण कचरा त्या नालीमध्ये अडकून सांडपाणी रस्त्यावर येत होते यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असून साथीच्या रोगाला आमंत्रण मिळत आहे.बीड नगरपालिकेकडे याची तक्रार करून देखील दखल घेत नसल्याने यांची माहिती रमाई नगर भागातील नागरिकांनी राकेश जाधव यांना दिल्यावर तात्काळ राकेश जाधव यांनी जाऊन स्वतः पाहणी करत स्वखर्चाने जेसीबी व कामगार लावून नाले सफाई करून दिली
तसेच टायगर ग्रुप च्या माध्यमातून बीड जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांनी या भागातील गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून कष्ट करून खाणाऱ्या कामगार लोकांना फराळाच्या किटचे वाटप करण्यात आले होते त्या निमित्ताने रमाई कॉलनी येथे फराळ किट करायला गेले असता तिथल्या स्थानिकांची अग्रगण्य मागणी ही होती की अण्णा या नालीची व सांडपाण्याची व्यवस्था केली तर फार बरे होईल मुलं आजारी पडत आहेत आम्ही नगरपरिषदेला स्वच्छता विभागाला सांगून कंटाळलो आहोत अशी मागणी तिथल्या लोकांनी केली. ती मागणी लक्षात घेऊन लगेचच राकेश अण्णा जाधव यांनी आपल्या स्वखर्चातून जेसीबी लावत व गौरव जावळे यांना सांगून प्रत्यक्षरीत्या स्पॉटवर जाऊन ते काम करा असे सांगितले.
सर्व कचरा व चोकअप झालेली नाली फोडून सर्व घाण काढून सांडपाण्याची व्यवस्था मोकळी केली. या कामानंतर रमाई कॉलनीतील प्रत्येक नागरिक आनंदित झाला असून राकेश अण्णा जाधव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आम्ही आपले आभारी आहोत अशी ग्वाही देत आहे.
टायगर ग्रुप च्या ब्रीद वाक्य प्रमाणे ” जनतेची सेवा आद्यकर्तव्य ” याचाच परिचय देत राकेश अण्णा जाधव यांनी कसल्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ रमाई नगर भागातील समस्या सोडवली. यापुढे कधीही कसलीही समस्या असेल आरोग्य विषयक, मूलभूत गरजा विषयक या सगळ्यासाठी 24 तास उपलब्ध असेल असा शब्द समस्त रमाई कॉलनीतील नागरिकांना राकेश जाधव यांनी दिला आहे.




