जुगार अड्ड्यावर पेठ बीड पोलिसांची धाड.
₹1.96 लाखांच्या मुद्देमालासह सहा जुगारी ताब्यात.

बीड (प्रतिनिधी)पेठ बीड पोलीस ठाण्याच्या पथकाने कोहिनूर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹1,96,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 जुलै 2026 रोजी पहाटे 12.45 वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत ₹14,600 रोख रक्कम, ₹1,33,000 किमतीच्या मोटारसायकली आणि ₹49,100 किमतीचे मोबाईल फोन असा एकूण ₹1,96,700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.निरीक्षक निलेश केळे यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे, पोलीस हवालदार नितीन राठोड, तसेच पोलीस अंमलदार विष्णू गुजर, पांडुरंग परजणे, अल्ताफ शेख, शरद भारती आणि विष्णू म्हेत्रे यांनी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.





