ब्रेकिंग न्यूज

लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे प्रकार अद्याप काही केल्याने कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील महिन्यातच चकलंबा पोलीस ठाणे निरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबल वाळूचा वाळूचे पैसे घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते ही घटना ताजी असतानाच पुन्हा आज पोलीस कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली.

सिरसाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल दत्ता नागनाथ निघुल याला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

माहितीनुसार, तक्रारदाराचा उसाने भरलेला ट्रॅक्टर काही शेतकऱ्यांनी शेतातून बाहेर जाण्यास अडथळा निर्माण केला होता. याबाबत तक्रारदाराने सिरसाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर संबंधित कॉन्स्टेबलने ट्रॅक्टर बाहेर काढण्यास मदत केली. मात्र, ही मदत केल्यानंतर “चहापाणी”च्या नावाखाली दोन हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून सिरसाळा येथेच कॉन्स्टेबल निघुल याला ताब्यात घेतले.

ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस अंमलदार प्रदीप सुरवसे, बिडकर, काळे तसेच चालक म्हेत्रे यांचा सहभाग होता.

दरम्यान, या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरु आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button