दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा;नऊ जुगारी ताब्यात.
तीन लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड ग्रामीण पोलिसांनी सलग दोन ठिकाणी छापे टाकत बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली असून एकूण ३ लाख २३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही कारवायांमध्ये एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लिंबाच्या झाडाखाली सुरू होता ‘तिर्रट’ जुगार.
दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांचे पथक गुप्त बातमीच्या आधारे तळेगाव शिवार, पांडुरंग पेट्रोलपंपासमोर मोकळ्या जागेत दुपारी सुमारे ३.४५ वाजता दाखल झाले.
तेथे लिंबाच्या झाडाखाली काही जण विनापरवाना ‘तिर्रट’ नावाचा पत्त्यांचा जुगार पैशांवर खेळत असल्याचे आढळले.
कारवाईदरम्यान खालील आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
1. धर्मराज नाना घाडगे,2. नानासाहेब आश्रुबा येवले,3. रावसाहेब अहिलाजी चौरे,4. अंगद बाबासाहेब घोलप,5. अर्जुन देवराव वनवे(सर्व रा. बीड)त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि ३ मोटारसायकली असा एकूण ₹१,५५,७६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पो.कॉ. युवराज पवार यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 36/2026 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
टेकडीजवळ ‘झन्ना-मन्ना’ जुगारावर दुसरी कारवाई
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पालवन शिवार, कान्होबाच्या टेकडीजवळ सायंकाळी ५.३० वाजता छापा टाकला.
तेथे काही जण ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
कारवाईतील आरोपी:
1. सागर रामहरी मस्के2. गणेश बाबासाहेब खंडागळे3. बाळकृष्ण विश्वनाथ प्रभाळे (सर्व रा. पालवन, ता.जि. बीड)4. दिलीप पप्पु पवार (रा. नवगण राजुरी, ह.मु. गोरे वस्ती, बीड)त्यांच्याकडून जुगार साहित्य, रोख रक्कम आणि ४ मोटारसायकली असा ₹१,६७,७०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पो.ह.कॉ. जगदीश करांडे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 39/2026 कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. अशोक मुदिराज यांच्यासह मनोज जोगदंड, रविंद्र झुनगरे, जगदीश करांडे, विजय जाधव, संतोष जायभाये, सोमनाथ जायभाये, युवराज पवार, संतोष कोटुळे, प्रभाकर जाधव आदी पोलिसांनी सहभाग घेतला.
अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार:पो.नि.मुदिराज
बीड ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या हद्दीत लपूनछपून चालणाऱ्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे.



