ब्रेकिंग न्यूज

हॉटेलमध्ये खुलेआम चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा.

सात महिलां,पुरुष ताब्यात.AHTU व पो.उ.आशोक मुदिराज यांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील वेश्या व्यवसाया विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून काही पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एक चारचाकी व तीन दुचाकी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपअ.अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि पोलिसांच्या पथकाने २९ जुलै बुधवार रोजी रात्री नऊ वाजता बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकाजवळील एका हॉटेल-धाब्यावर छापा टाकला. येथे खुलेआम अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ त्या हॉटेलवर छापा मारला. कारवाई दरम्यान सात पीडित महिला व काही पुरुष व काही अक्षयपार्य वस्तू आढळून आल्या.त्या महिला बीड सह बाहेर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक तपासात माहिती मिळत असून संबंधित ठिकाणी ऑनलाइन मोबाईल क्रमांकांच्या माध्यमातून जाहिरात करून ग्राहक बोलावले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान जागा मालक व दलाल यांच्या माध्यमातून कोलकाता, मुंबई आणि पुणे येथून महिलांना आणून हा व्यवसाय सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, 1956 (Immoral Traffic (Prevention) Act, 1956) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याच कारवाई दरम्यान नगरनाका परिसरातही दुसरा छापा टाकण्यात आला. तेथे दोन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,DYSP वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अशोक मुदिराज व AHTU यांनच्या पथकाने केली.

बीड शहरातील काही हॉटेल लॉजमध्येही अशाच प्रकारचे अवैध प्रकार सुरू असल्याची चर्चा असून, अल्पवयीन अथवा संशयास्पद जोडप्यांना खोल्या देण्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.अल्पवयीन जोडप्याची नोंद करत नसून त्यानंच्यासाठी विशेष रूम देत असून अशा ठिकाणांची पोलिसांनी नियमित तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कायदा काय सांगतो?

अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, 1956 अंतर्गत वेश्याव्यवसायासाठी कुंटणखाना चालविणे, देहव्यापारासाठी व्यक्तींची दलाली करणे, महिलांची फूस लावणे किंवा त्यांचे शोषण करणे हे दंडनीय गुन्हे आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यास कारावास व दंडाची तरतूद आहे. मात्र, पीडित महिलांकडे कायद्याने गुन्हेगार म्हणून नव्हे तर पुनर्वसनाची गरज असलेल्या व्यक्ती म्हणून पाहण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button