ब्रेकिंग न्यूज

जेष्ठ विधीज्ञ ऍड.हसेगावकर यांचे 89 व्या वर्षी निधन.

बीड – अँड.प्रभाकर भगवानराव हसेगावकर यांचे आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी मेडिकल हॉस्पिटल मध्ये निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांनी बीडच्या विधी क्षेत्रात अनेक वर्षे कार्य करत असंख्य वकिलांना मार्गदर्शन केले होते.
ऍड.सह्याक सरकारी वकील अमित हसेगावकर यांचे वडील होते.

अँड. हसेगावकर यांच्या निधनाची वार्ता समजताच विधी क्षेत्रासह विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. अनेक तरुण वकिलांसाठी ते प्रेरणास्थान होते.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी अमरधाम स्मशानभूमी येथे होणार असून वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. वेळ लवकरच कळविण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button