हर्षद शिंदे हत्या प्रकरण;आरोपी विशाल सूर्यवंशीला पोलिसांनी घटनास्थळी नेऊन चौकशी.
काही वर्षापूर्वी भांडण झाल्याने खून केल्याचे कारण सांगितले.

बीड शहरातील अंकुश नगर भागात दिनांक ६ जानेवारी रोजी मंगळवार दुपारी दिवसा ढवळ्या हर्षद तुळशीराम शिंदे यांचा बंदुकीच्या गोळ्या झाडून पाठलाग करत धारदार हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आला होता. या थरारक घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता.
हर्षद शिंदे यांच्यावर गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ शोषित मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
या खून प्रकरणातील आरोपी विशाल सूर्यवंशी याला बीड स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने चार दिवसांनी केज–कळंब रोडवरून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलीस कोठडीदरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रवीणकुमार बांगर यांनी आरोपी विशाल सूर्यवंशी याला घेऊन अंकुश नगर येथील घटनास्थळी नेऊन सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने काही वर्षांपूर्वी हर्षद शिंदे यांच्याशी झालेल्या वादातूनच खून केल्याचे कारण सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या खूनामागे आणखी कोणते कारण आहे का, इतर कुणाचा सहभाग आहे का, याचाही शोध शिवाजीनगर पोलिस करत आहेत.
या कारवाईत शिवाजी नगर पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर,Asi संतोष राऊत,Asi बलराज सुतार, पोलीस हवालदार रवींद्र आघाव पोलीस अंमलदार अनंत गिरी, विलास कांदे, बाळू राहाडे, ज्ञानेश्वर मराडे यांनी आरोपी विशाल सूर्यवंशीच्या चौकशीत खुना बाबद आणखी काही माहिती याचा तपास करत आहेत.



