ब्रेकिंग न्यूज

पंचवीस लाखांसाठी विवाहितेचा छळ.

विवाहीतेला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात महिलांची सुरक्षितता ऐरणीवर आली असून, शहरातील एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंचवीस लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्मा महेश भांगे (रा. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती महेश भांगे, सासरा, सासू, दीर व दोन नंदा यांनी वारंवार पंचवीस लाख रुपये आणण्याची मागणी करत आपल्याला मानसिक त्रास दिला. मागणी पूर्ण न झाल्याने त्यांना मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

   कौटुंबिक हिंसाचार, शारीरिक मारहाण, मानसिक छळ व धमकी या प्रकारांमुळे अखेर कंटाळून रेश्मा भांगे यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दरम्यान, पीडित विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत, “माझ्या व माझ्या लहान मुलाच्या जीवाला सासरच्या लोकांकडून धोका आहे. हे लोक पैशाचे व सोन्याचे लोभी असून काहीही करू शकतात,” अशी भीती व्यक्त केली आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button