ब्रेकिंग न्यूज

अपघातात तरुण जागीच ठार.

बीड शहराजवळील खजाना विहिर जवळ अपघात

 

बीड (प्रतिनिधी): सोलापूर–धुळे महामार्गावरील वडगाव फाट्याजवळ आज दिनांक 24 मार्च  शनिवार रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता भीषण अपघात घडला. दुचाकीवरून बीड कडे येणाऱ्या तरुणाला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी स्वराला धडक दिल्यानंतर चार चाकी गाडी चालकाने घटनास्थळावरून  पोवारा केला.

युवा नेते प्रेम कांबळे यांनी तातडीने १०८ क्रमांकावर कॉल करून ॲम्बुलन्सला माहिती दिली. मात्र, ॲम्बुलन्स वेळेवर न पोहोचल्याने ऑटो रिक्षामध्ये अपघात ग्रस्त तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु अति रक्तस्त्राव व वेळेवर उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातातील मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button