बीड जिल्हा

अंबाजोगाई जिल्हा कारागृहाच्या प्रस्तावित जागेला संरक्षक भिंत उभारण्यासाठी ४ कोटींचा निधी मंजुर: आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश.

प्रस्तावित जिल्हा कारागृह संरक्षक भिंत.

अंबाजोगाई-प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या ३० एकर शासकीय जमीनीला संरक्षक भिंत उभारण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ४ कोटी ५लक्ष ७९ हजार २५८ रुपयांचा निधीला अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे अंबाजोगाई जिल्हा कारागृह व्हावे आणि भविष्यात सदर जागेवर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे हे मोठे यश मिळाले आहे.

सर्वे क्र १/अ/५ मधील ३० एकर जागेला ९जानेवारी २६ रोजी मान्यता देण्यात आली होती,

बीड जिल्हा येथील पडणारा ताण लक्षात घेता अंबाजोगाई येथे कारागृह मंजुर करून घेण्यात आले. त्यासाठी सर्वे क्र १७ मधील ३० एकर जागा मिळाली परंतू या जागेवर भविष्यात अतिक्रमण रोखण्यासाठी हि मोठी गरज असल्याने ती अत्यावश्यक होती. यानिर्णयाचे अंबाजोगाई आणि परिसरातुन स्वागत केले जात आहे. हा प्रश्न मार्गी लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्हा पालकमंत्री सुनेत्रा पवार ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button