ब्रेकिंग न्यूज

अतुलजी सावे यांचा वाढदिवस अमोल राऊत यांच्याकडून सामाजिक उमंत्रीपक्रमातून साजरा.

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नवजात बालकांना ड्रेस तर मातांना साडी व फळ वाटप.

 

बीड शहर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचा अभिष्टचिंतन सोहळा काल मोठ्या उत्साहामध्ये व विविध सामाजिक उपक्रमातून काल बीड शहरांमध्ये संपन्न झाला. महाराष्ट्र सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल राऊत यांनी जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी २५,२६ फेब्रुवारी रोजी जन्म झालेल्या कंन्या व त्या मातांना साडी वाटपाचे ,बाळाला ड्रेसचे तसेच केळी व इतर फळांचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम राबवला तर या उपक्रमाबद्दल त्यांचे शहरवासीयांकडून व रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक केले जाऊ लागले आहे.

बीड तालुक्यातील युवा नेते तथा सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल राऊत यांनी काल मंत्री अतुल सावे यांचा वाढदिवस बीड जिल्हा रुग्णालयामध्ये काल व परवा जन्म झालेल्या नवजात कन्यांना व त्यांच्या मातांना वस्त्रदान करून व फळ वाटप करून साजरा केला आहे या केलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे शहरवाशियांकडून तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त केले जाऊ लागले आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button