बीड कोर्ट परिसरात वकिलाला मारहाण.
वकीलसंघ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात व बीड पोलीस अधीक्षकाकडे धाव.

बीड ( प्रतिनिधी)बीड जिल्हा न्यायालय परिसरात एका वकिलावर काही महिला व पुरुषांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. राम पांडुरंग डोंगरे (सदस्य, बीड जिल्हा वकील संघ) यांना राधाकिसन रामचंद्र करपे (रा. शाहूनगर, बीड) यांच्यासह इतर तीन पुरुष व चार महिलांनी मिळून न्यायालय परिसरात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वाहन लावण्याच्या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. त्यानंतर करपे यांनी काही महिलांना बोलावून घेतल्याचे सांगितले जात असून न्यायालयातील टेबलजवळच वकिलाला मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वकील डोंगरे यांनाच मारहाण करून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आले ची माहिती मिळत आहे
दरम्यान, दुपारी साडेअडीच वाजेपर्यंत या घटनेची अधिकृत नोंद पोलिसांत झाली नव्हती.मात्र सर्व वकील संघ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते व त्यानंतर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल होत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली.
तसेच या प्रकरणी पुढील कारवाईची मागणी करत वकील पोलीस अधीक्षक कार्यालयातही गेले असल्याची माहिती मिळाली आहे. आता या घटनेवर पोलीस प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






