ब्रेकिंग न्यूज

धावत्या कारने घेतला पेट !

कार जाळून खाक;डॉक्टर दांपत्य थोडक्यात बचावले.

लिंबागणेश (दि.१५) – बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ. भारत मेंगडे व डॉ. प्रतिभा मेंगडे हे रविवारी पहाटे सुमारे सव्वा सहाच्या दरम्यान बोरखेड येथील शेतात बोअरवेलची गाडी आल्याने तिकडे निघाले होते. महाजनवाडी फाट्याजवळ त्यांच्या व्हिस्टा इंडिका (एमएच २३ वाय २३२१) या कारमधून अचानक धूर निघू लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.

प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडले. काही क्षणांतच कारने पेट घेतला. वायर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉ. भारत मेंगडे यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, सय्यद अख्तर, सुमित मुळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांच्यासह शिवाजी घरत, सतीश घरत, ऋषिकेश घरत, अभिषेक घरत व अक्षय घरत यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button