
बीड (प्रतिनिधी) : शहरातील पेठ बीड परिसरातील एमआयडीसी हद्दीत पांडुरंग नगर भागात शेजारी राहणाऱ्या कोकाटे व करपे या दोन कुटुंबांत मागील काही महिन्यापूर्वी वाद झाला होता.
मागील वादातुनच दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुन्हा या दोन कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे.महिलेने हातात लाकडी दांडा घेऊन हल्ला केल्याचे दिसत असून पहिले सोबत एक पुरुष व एक महिला देखील असल्याचे दिसत आहे या प्रकरणात एका गटाकडून विनयभंगाची तक्रार पेठ बीड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून दुसऱ्या गटाकडून अद्याप तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
समोरासमोर असलेल्या घरांमधील वादाचे रूपांतर गोंधळात झाल्याचे समोर येत आहे. घटनेदरम्यान काही महिला व इतर व्यक्ती शेजारील घराकडे जात असल्याचे दृश्य स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केले असून सीसीटीव्ही देखील घटना तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून हाताला दुखापत झाली असल्याने बीड शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पो.हे. देशमुख पो. हे.इंगोले यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.








